England vs India, 3rd Test at Lord's, London: लोकेश राहुलच्या शतकाने टीम इंडियाला लॉर्ड्सवर फ्रंटसीटवर बसवले. रिषभ पंतसह त्याने चौथ्या विकेटसाठी विक्रमी १४१ धावांची भागीदारी करताना इंग्लंडच्या पोटात गोळा आणला. पण, लंच ब्रेकपूर्वी रिषभ रन आऊट झाला, तर ब्रेकनंतर राहुलचे शतक पूर्ण झाले, परंतु शोएब बशीरच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. KL RAHUL ने या शतकासह मोठे विक्रम नावावर केले. आशियाई सलामीवीर म्हणून लॉर्ड्सवर दोन शतकं झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.