No Gill, Pant, Rahul, Jaiswal at Practice – Bumrah Gears Up for Lord's Test
भारतीय संघाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली बर्मिंगहॅग कसोटी जिंकून इंग्लंडविरुद्धची मालिक १-१ अशी बरोबरीत आणली. लीड्सवरील पराभवानंतर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत केलेले पुनरागमन यजमान इंग्लंड चकीत झाले. त्यामुळे चवताळलेल्या इंग्लंडने संघात तातडीने बदल केला आणि आता त्यांनी हिरवी खेळपट्टी ठेवून भारताला चॅलेंज केले आहे. पण, टीम इंडियाने 'LORD' जिंकायची तयारी केली आहे. गौतम गंभीरचा मास्टर प्लान समोर आला आहे.