England vs India, 3rd Test at Lord's, London: जो रूट ( Joe Root) टीम इंडियाची डोकेदुखी वाढवतोय हे मान्य करायला हरकत नाही. १४ व्या षटकात दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर इंग्लंडने दबावात असतानाची चांगले पुनरागमन केले. रूट व ऑली पोप यांच्या शतकी भागीदारीने भारताला बॅकफूटवर फेकले. ही जोडी तोडण्यासाठी टीम इंडियाकडून स्लेजिंग झाली, शाब्दिक बाचाबाचीही झाली, परंतु त्याचा फार फरक या दोघांच्या खेळीवर झाला नाही. त्यामुळेच मोहम्मद सिराजचा ( Mohammed Siraj) पारा चढलेला पाहायला मिळाला आणि त्याने रूटच्या दिशेने जवळपास चेंडू फेकलाच होता.