England vs India, 3rd Test at Lord's, London: जसप्रीत बुमराहच्या पाच विकेट्सने इंग्लंड संघाला हादरे दिले. पहिल्या दिवसाच्या सावध ४ बाद २५१ धावांपासून आज सुरुवात करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर गुंडाळला गेला. जसप्रीतने सुरुवातीच्या काही षटकांत सेट फलंदाजांना माघारी पाठवले होते. त्यामुळे यजमानांची अवस्था ७ बाद २७१ अशी झाली होती. जेमी स्मिथ व ब्रेडन कार्स उभे राहिले आणइ संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मोहम्मद सिराजने ही जोडी तोडली आणि स्मिथची विकेट घेऊन केलेली कृती चर्चेत आली.