
England vs India, 3rd Test at Lord's, London: भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीत पाहुण्यांनी लॉर्ड्स मैदान गाजवले. ३८७ धावांच्या प्रत्युत्तरात ३ विकेट्स १०७ धावांवर गमावल्यानंतरही भारताने इंग्लंडचा ताण वाढवला. बोटाला दुखापत झाल्यामुळे सुरुवातीचे दीड दिवस मैदानाबाहेर असलेला रिषभ पंत जिद्दीने खेळला. त्याने KL Rahul ला अप्रतिम साथ देताना कसोटीतील त्याच्यासोबतची तिसरी शतकी भागीदारी पूर्ण केली. पहिल्या सत्रात या दोघांनी सहाच्या सरासरीने धावा चोपताना पिछाडी बरीच कमी केली.