England vs India, 3rd Test at Lord's, London: भारतीयांनी झेल सोडून इंग्लंडला डोकं वर काढण्याची संधी दिली असताना यजमानांकडून अफलातून झेल पकडलेले पाहायला मिळाले. शतकवीर जो रूट ( Joe Root) याने क्षेत्ररक्षणात दाखवलेल्या चपळतेचं कौतुक सारं जग करताना दिसत आहे. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर करुण नायरचा झेल टिपून रूटने सर्वांना चकित केले. डाव्या बाजूला डाईव्ह मारत त्याने एका हाताने चेंडू टिपला आणि भारताला दुसरा धक्का बसला. रूटने या झेलसह राहुल द्रविडच्या नावावरील वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला, परंतु झेलवरून वादही सुरू झाला.