England vs India, 3rd Test at Lord's, London: जो रूटचे शतक... ऑली पोप, बेन स्टोक्स, जेमी स्मिथ व ब्रेडन कार्स यांची उपयुक्त खेळी... त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पाच विकेट्समुळे भारताचे पुनरागमन. लॉर्ड्सवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत क्षणाक्षणाला नाट्यमय वळणं पाहायला मिळाली. इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालही ( १३) माघारी परतला आहे. पण, सर्वांसमोर सध्या एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे रिषभ पंत ( Rishabh Pant) फलंदाजीला येणार का?