England vs India, 3rd Test at Lord's, London: लोकेश राहुल व रिषभ पंत यांनी यजमान इंग्लंडची डोकेदुखी वाढवली आहे. तिसऱ्या कसोटीत ३८७ धावांचा पाठलाग करताना भारताला १०७ धावांवर तीन धक्के बसले होते. पण, पंत व राहुल जोडी उभी राहिली आणि शतकी भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणले. KL Rahul पाठोपाठ रिषभनेही अर्धशतक झळकावताना विक्रमाला गवसणी घातली.