
England vs India, 3rd Test at Lord's, London: भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नसली तरी त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. लोकेश राहुलच्या ( KL Rahul) अर्धशतकाने टीम इंडियाला सावरले आहे. शुभमन गिलला मोठी खेळी करता आली नसली तरी त्याने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला. दुखापतग्रस्त रिषभ पंतला फलंदाजीला आलेला पाहून चाहते आनंदीत झाले आहे.