England vs India, 3rd Test at Lord's, London: लोकेश राहुल व रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव मजबूत केला. ३ बाद १०७ धावांनंतर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली. पण, तीन षटकांच्या अंतराने दोघंही सेट फलंदाज माघारी पाठवून इंग्लंडने डोके वर काढले. नितीश कुमार रेड्डी व रवींद्र जडेजा यांचा ताळमेळ सुरुवातीला डगमगलेला दिसला आणि दोघंही रन आऊट होता होता वाचले. सेट झाल्यावर या दोघांनीही नंतर हात मोकळे केले.