England vs India, 3rd Test at Lord's, London: इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत रोमहर्षक विजयाची नोंद केली आणि भारताविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील धावसंख्या ३८७ अशी समान सुटल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताकडूनही संघर्ष पाहायला मिळाला आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) शेवटच्या षटकापर्यंत मैदानावर उभा राहिला. पण, मोहम्मद सिराज दुर्दैवीरित्या बाद झाला आणि भारताचा खेळ संपला. भारताला दुसऱ्या डावात १७० धावांवर गुंडाळून इंग्लंडने २२ धावांनी ही मॅच जिंकली.