इंग्लंडने चौथ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला
लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल यांनी सावध सुरुवात करताना १२ षटकांत ३३ धावा केल्या
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत
England vs India, 4th Test at Manchester Live : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला चौथ्या कसोटीत तीन बदल करावे लागले. नितीश कुमार रेड्डी व आकाश दीप यांना दुखापतीने सतावल्याने बाहेर बसावे लागले, तर फॉर्मात नसलेल्या करुण नायरला अखेर प्लेइंग इलेव्हनमधून हाकलले गेले. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दूल ठाकूर व बी साई सुदर्शन यांचे पुनरागमन झाले आहे, तर अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी दिली आहे. हे बदल होत असताना पुन्हा एकदा एक खेळाडू दुर्लक्षित राहिला आहे आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७८००+ करण्याचा उपयोग काय? असा सवाल आता होताना दिसतोय...