भारत-इंग्लंड चौथी कसोटी २३ जुलैपासून सुरू होत आहे
नितीश कुमार रेड्डीनेही दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे
आकाश दीप, अर्शदीप सिंग व रिषभ पंत हेही दुखापतग्रस्त आहेत
Nitish Reddy ruled out of England series अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत १-२ अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला धक्क्यांमागून धक्के बसत आहेत. तिसऱ्या कसोटीत रिषभ पंतला ( Rishabh Pant) दुखापत झाली होती आणि त्यामुळे चौथ्या कसोटीत त्याच्या खेळण्यावर संभ्रम आहेच. त्याचवेळी आकाश दीप व अर्शदीप सिंग यांनाही सराव सत्रात दुखापत झाली. अर्शदीप सिंगे कसोटी पदार्पणाची स्वप्न लांबणीवर पडले आहे. त्यात अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी यानेही माघार घेतली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी निवडावी, हाच प्रश्न कर्णधार शुभमन गिलला पडला आहे.