
रिषभ पंतच्या उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला सहा आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागेल.
पंत यष्टीरक्षण करणार नाही, त्याची जागा ध्रुव जुरेलने घेतली आहे, पण तो फलंदाजीसाठी तयार आहे.
भारताने ४ बाद २६४ वरून दुसऱ्या दिवशी सुरुवात केली, पण रवींद्र जडेजा लवकरच बाद झाला.
England vs India, 4th Test at Manchester Live: रिषभ पंतला दुखापतीतून सावरण्यासाठी आता सहा आठवडे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याच्या पायावर चेंडू आदळला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. वैद्यकीय अहवालाने टीम इंडियाचे टेंशन वाढवले आहे. रिषभला पायावर जोर पडेल असे काही करायचे नाही, असा डॉक्टरांनी सल्लाही दिलाय. पण, तो तरीही ओल्ड ट्रॅफर्ड येथे दाखल झाला आणि संघाला गरज पडल्यास फलंदाजीसाठी येणार असल्याचा निर्धार त्याने व्यक्त केलाय...