भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
रिषभ पंतच्या उजव्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त आहे.
वैद्यकीय तपासणीनंतर त्याला किमान सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
India to play without Rishabh Pant in 4th Test vs England: मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी दुखापत झाल्यामुळे रिटायर्ड हर्ट झालेल्या भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला मोठा धक्का बसला आहे. पंतच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला सहा आठवड्यांचा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यामुळे त्याला चौथ्या कसोटीत खेळता येणार नाही, असे दिसतेय. तरीही त्याला इंजेक्शन देऊन फलंदाजीसाठी तयार करता येईल का, अशी विचारणा बीसीसीआयने वैद्यकीय टीमकडे केली आहे. अन्यथा भारताला १० फलंदाजांसह मँचेस्टर कसोटीत इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे.