भारत-इंग्लंड चौथी कसोटी उद्यापासून मँचेस्टर येथे
इंग्लंडने दोन दिवसआधी प्लेइंग इलेव्हन केली जाहीर
टीम इंडियाला दुखापतीने सतावले आहे
England’s team selection mistake in Old Trafford Test : भारत-इंग्लंड यांच्यातली चौथी कसोटी उद्यापासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवली जाणार आहे. यजमान इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असल्याने मँचेस्टरमध्ये विजय मिळवणे टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दुखापतींमुळे टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हन निवडणे आव्हानात्मक वाटत असले तरी इंग्लंडने आधीच त्यांचे अंतिम अकरा खेळाडू जाहीर केले आहेत. पण, इंग्लंडची ही घाई त्यांनाच महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि तशी भन्नाट आकडेवारी समोर आली आहे.