Ind vs Eng : रांची कसोटीत 'हा' खेळाडू करणार टीम इंडियात पदार्पण? हे असेल गोलंदाजीचे कॉम्बिनेशन

Akash Deep Likely To Make Test Debut At Ranchi : भारत आणि इंग्लंड यांच्यात 23 फेब्रुवारीपासून पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे
Akash Deep Likely To Make Test Debut At Ranchi marathi news
Akash Deep Likely To Make Test Debut At Ranchi marathi newssakal

India vs England 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात 23 फेब्रुवारीपासून पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना रांचीच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यापूर्वी मंगळवारी रात्री टीम इंडियाच्या संघात बदल झाल्याची माहिती समोर आली. या बदलाचे दोन मोठे मुद्दे म्हणजे जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल रांची कसोटी सामन्यातून बाहेर गेले आहे.

Akash Deep Likely To Make Test Debut At Ranchi marathi news
Virat Anushka Baby Boy : त्याच्या नावासारखंच... विराट अन् अनुष्काला पुत्ररत्न होताच सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

जसप्रीत बुमराह या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्यांना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी मुकेश कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर राहुलच्या जागी आलेला देवदत्त पडिक्कल संघात कायम आहे. अशा परिस्थितीत आता रांची कसोटीत कोण खेळणार हा प्रश्न आहे. बुमराहच्या जागी मुकेश खेळणार की आकाशदीप पदार्पण करणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पण सामन्यात 27 वर्षांचा आकाशदीप रांचीमध्ये पदार्पण करू शकतो. आणि तो मोहम्मद सिराजसोबत जबाबदारी पार पाडू शकतो. आकाशदीपचे पदार्पण म्हणजे या सामन्यातही भारतीय संघ 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे.

Akash Deep Likely To Make Test Debut At Ranchi marathi news
Ranji Trophy Manoj Tiwary : सर काल रात्री काय घेतलं होतं...? मनोज तिवारी आता अंपायर्सच्या हँगओव्हरवर काय बोलला?

आकाश आणि मुकेश कुमार हे दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे वेगवान गोलंदाज आहेत. चौथ्या कसोटीसाठी भारताकडे मोहम्मद सिराजच्या जोडीदारासाठी वेगवान गोलंदाजीचे दोन पर्याय आहेत. पण इंडियन एक्स्प्रेसने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते आकाशच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. कारण ते भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामन्यात त्याच्या गोलंदाजीने प्रभावित झाले आहेत.

Akash Deep Likely To Make Test Debut At Ranchi marathi news
Abhishek Sharma SRH : सनराइजर्स हैदराबादच्या स्टार खेळाडूला पोलिसांनी पाठवली नोटीस; काय आहे प्रकरण?

मुकेश कुमारसोबत आकाश हा लाल चेंडू क्रिकेटमध्ये बंगालचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. आकाशने 30 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 23.58 च्या सरासरीने 104 बळी घेतले आहेत. विझागमधील दुसऱ्या कसोटीदरम्यान मुकेशने 12 षटके टाकली, पण सपाट खेळपट्टीवर तो विकेटसाठी झगडताना दिसला. दुसऱ्या डावात दहाव्या क्रमांकावर असलेल्या शोएब बशीरची त्याची एकमेव विकेट होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com