
भारत-इंग्लंड यांच्यातली चौथी कसोटी आजपासून मँचेस्टर येथे सुरू होतेय.
लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर भारत १-२ अशा पिछाडीवर आहे.
भारतीय संघात आज तीन बदल होणे अपेक्षित आहे.
England vs India, 4th Test at Manchester Live : भारतीय संघ आजपासून सुरू होणाऱ्या मँचेस्टर कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्याची शक्यता आहे. लॉर्ड्स कसोटीतील पराभवामुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १-२ असा पिछाडीवर गेला आहे. त्यामुळे चौथी कसोटी जिंकणे मालिका वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यात भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग यांच्यानंतर आकाश दीपनेही दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हन निवडताना डोकेदुखी होणार आहे. अशात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने तीन बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.