
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
भारतीय संघाने सलग १४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत गमावला टॉस
भारतीय संघात तीन बदल, अंशूल कंबोजचे पदार्पण
England vs India, 4th Test at Manchester Live : शुभमन गिलने सलग चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावली आणि इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग १४ सामन्यांत भारताने टॉस गमावला आहे. यापूर्वी राजकोट येथे जानेवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने शेवटचा टॉस जिंकला होता. भारतीय संघ मँचेस्टर कसोटीत तीन बदलांसह मैदानावर उतरला आणि आतापर्यंत खेळलेल्या ५९३ कसोटी सामन्यात जे घडले नव्हते ते मँचेस्टरमध्ये घडले.