टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दुखापतींचा सामना करावा लागत आहे.
रिषभ पंत दुखापतग्रस्त झाल्याने पाचव्या कसोटीसाठी इशान किशनला पर्याय म्हणून बोलावले जाणार होते.
मात्र, इशान किशन स्कूटीवरून पडल्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे
Who will replace Rishabh Pant for 5th Test vs England? भारतीय संघावर दुखापतीचे ग्रहण लागले आहे. भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पायाला दुखापत झाल्याने रिषभ पंतने मैदान सोडले. त्याला तातडीने स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि आज समोर आलेल्या अहवालात त्याला दुखापतीतून बरं होण्यासाठी ६ आठवडे लागणार असल्याचे समजले. त्यामुळे पाचव्या कसोटीसाठी इशान किशन ( Ishan Kishan) याला बोलावणं जाणार असल्याची चर्चा सुरू होती, परंतु तोही जखमी झाला अन् आता तिसराच पर्याय समोर आला आहे.