बेन डकेट (९४) आणि झॅक क्रॉली (८४) यांच्या शतकी भागीदारीने इंग्लंडला दमदार सुरुवात दिली.
जो रूटने ओल्ड ट्रॅफर्डवर कसोटीतील १००० धावा पूर्ण करून इंग्लंडच्या तिसऱ्या फलंदाजाचा मान मिळवला.
रूटने जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांचा विक्रम मोडून कसोटी क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
England vs India, 4th Test at Manchester Live: इंग्लंडने चौथ्या कसोटीवर मजबूत पकड बनवली आहे. बेन डकेट व झॅक क्रॉली यांना शतकाने थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी त्यांनी रचलेल्या पायावर आता धावांचे इमले रचले जात आहेत. भारताच्या पहिल्या डावातील ३५८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासाभराच्या खेळात २ बाद २६६ धावांपर्यंत मजल मारली आहे. जो रूट ( Joe Root) व ऑली पॉप ही जोडी मैदानावर उभी आहे. भारतीय गोलंदाजांकडून तसा प्रभावी मारा झालेला पाहायला मिळालेला नाही आणि रूटने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे.