जो रूटचे चौथ्या कसोटीत खणखणीत शतक, १७८ चेंडूंत पूर्ण केली सेंच्युरी
कसोटी क्रिकेटमधील जो रूटचे ३८ वे शतक
भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतक करण्याचा विक्रम केला नावावर
England vs India, 4th Test at Manchester Live: जो रूटने ( Joe Root) पुन्हा एकदा त्याला कसोटीतील सर्वोत्तम फलंदाज का म्हटले जाते, हे दाखवून दिले आहे. इंग्लंड-भारत चौथ्या कसोटीत त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते पाहून टीम इंडियाची डोकेदुखी नक्की वाढली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावताना जॅक कॅलिस व राहुल द्रविड यांना मागे टाकले. शिवाय सर्वाधिक ५०+ धावांच्या विक्रमातही त्याच्यापुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे. त्याने मँचेस्टर कसोटीत शतक झळकावताना इंग्लंडला फ्रंटसीटवर बसवले आहे.