भारत-इंग्लंड यांच्यातली चौथी कसोटी २४ जुलैपासून सुरू होणार
इंग्लंडने मालिकेत २-१ अशी घेतली आहे आघाडी
लोकेश राहुलचा फॉर्म टीम इंडियाच्या फायद्याचा ठरतोय, पण..
KL Rahul milestone 4th Test Manchester 2025 : लॉर्ड्स कसोटीत विजयाचा घास थोडक्यात हिसकावला गेल्यानंतर आता टीम इंडियाच्या चाहत्यांना मँचेस्टर कसोटीची प्रतीक्षा आहे. भारत-इंग्लंड यांच्यातली चौथी कसोटी २३ जुलैपासून सुरू होत आहे आणि यात विजय मिळवून मालिका पुन्हा बरोबरीत आणण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. भारताच्या फलंदाजीची संपूर्ण भीस्त अनुभवी लोकेश राहुल याच्या खांद्यावर आहे आणि त्यालाही मँचेस्टरवर इतिहास घडवण्याची संधी आहे.