IND vs ENG चौथ्या कसोटीत कुलदीप यादवला संधी न मिळाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
जो रूटच्या १५० धावांच्या खेळीने इंग्लंडने भारतावर १८६ धावांची आघाडी घेतली आहे.
मॉर्ने मॉर्केलने सांगितले की संघाचा बॅटिंग-बॉलिंग समतोल साधण्यासाठी कुलदीपला बाहेर ठेवण्यात आले.
India vs England 4th Test Gambhir-Gill decision on Kuldeep Yadav : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) पुन्हा एकदा संधी न मिळाल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांच्यावर या निर्णयावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यावर भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) याने मोठा खुलासा केला आहे.