रिषभ पंतला तिसऱ्या कसोटीत यष्टीरक्षण करताना दुखापत झाली
त्या कसोटीत ध्रुव जुरेलने यष्टीरक्षण केले होते
रिषभ पंतने मालिकेत फलंदाजीत दमदार कामगिरी केली आहे
भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत मालिकेत पुनरागमनासाठी जोरदार तयारी करतोय. लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर मालिकेत टीम इंडिया १-२ अशी पिछाडीवर गेली आहे. त्यामुळे मँचेस्टर कसोटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पण, या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहला पुन्हा एकदा वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली विश्रांती दिली जाऊ शकते, तर रिषभ पंत ( Rishabh Pant) अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. तो जरी प्लेइंग इलेव्हनमध्ये असला, तरी यष्टींमागे दिसण्याची शक्यता कमीच आहे.