भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीचा पहिला दिवस रिषभ पंतच्या दुखापतीमुळे चर्चेत
ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स फटका मारताना पायाला झाली दुखापत
मैदानाबाहेर कारने न्यावे लागले, त्यानंतर अॅम्ब्युलन्सने हॉस्पिटलमध्ये नेले
England vs India, 4th Test at Manchester Live : भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) दुखापतीच्या घटनेने भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात करून दिली. शुभमन गिल अपयशी ठरला, परंतु साई सुदर्शन व रिषभ पंत यांनी इंग्लंडचा घाम फोडला. रिषभच्या फटकेबाजीने इंग्लिश गोलंदाज हैराण झाले होते, परंतु नशिबाने पलटी मारली अन् रिषभला दुखापत झाली. ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू थेट रिषभच्या उजव्या पायावर आदळला. त्यानंतर जे घडले ते....