FAQsभारत-इंग्लंड यांच्यातला चौथा सामना २३ जुलैपासून
रिषभ पंतच्या दुखापतीवर मोठे अपडेट्स
अंशुल कंबोज याच्या गोलंदाजीचा कसून सराव
Will Rishabh Pant play in 4th Test vs England : लॉर्ड्सवरील पराभव मागे सोडून टीम इंडिया नव्या दमाने इंग्लंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली असली तरी त्यांचा मनोबल उंचावलेलाच दिसतोय. २३ जुलैपासून मँचेस्टर येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय खेळाडूंनी आज कसून सराव केला. या सराव सत्रात काही नवे चेहरेही दिसले आणि संघाबाहेर बसवलेले चेहरेही पाहायला मिळाले. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा मालिका बरोबरीत आणण्यासाठी सज्ज झाली आहे.