रिषभ पंतचा सहा आठवड्यांसाठी विश्रांतीचा सल्ला
भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत फलंदाजी करणे अवघड
इशान किशनला पाचव्या कसोटीसाठी तयार राहण्याचा सल्ला
Ishan Kishan comeback after 2 years in India’s Test squad : भारतीय संघाला मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी धक्का देणारी बातमी मिळाली आहे. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेलेल्या रिषभ पंतला ( Rishabh Pant) सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला गेला आहे. तरीही वैद्यकीय पथक वेदनाशामक औषध घेऊन तो पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकतो का, हे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. हे शक्य न झाल्यास भारताला १० फलंदाजांसह इंग्लंडविरुद्ध खेळावे लागणार आहे. आजच्या अपडेट्समुळे रिषभ पाचव्या कसोटीतून माघार घेणार असल्याचे निश्चित झाल्याने बीसीसीआयने दोन वर्षांपासून कसोटी संघाबाहेर असलेल्या यष्टीरक्षक-फलंदाजाला बोलावणे धाडले आहे.