मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने भारतावर मजबूत आघाडी मिळवली आहे.
जो रूटने अप्रतिम फलंदाजी करत १५० धावांची भक्कम खेळी केली.
त्याला झॅक क्रॉली, बेन डकेट आणि ऑली पोप यांनी दमदार साथ दिली.
England vs India, 4th Test at Manchester Live: इंग्लंडने चौथ्या कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. भारताची दिशाहीन गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षत्रणाचा इंग्लंडने पुरेपूर फायदा उचलला. जो रूटच्या ( Joe Root) शतकाने भारताला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. त्याआधी बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप यांनी अर्धशतकी खेळी करून इंग्लंडचा पाया भक्कम केला. ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीचा तिसरा दिवस हा रूटच्या नावावर राहिला. कर्णधार बेन स्टोक्सनेही अर्धशतक झळकावताना रूटसह पाचव्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली. हॅमस्ट्रींगमुळे रिटायर्ड हर्ट झालेला बेन स्टोक्स पुन्हा फलंदाजीला आला अन् संघाला ५५० धावांच्या नजीक घेऊन गेला.