
India vs England 5th T20I Wankhede Stadium Live : भारताकडून दुसरे वेगवान अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माने ( ABHISHEK SHARMA ) वादळी शतक पूर्ण केले. तिलक वर्मासह त्याने दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करून भारताला मजबूत धावसंख्या उभारून दिली. अभिषेकला या सामन्यात रोहित शर्माचा ३५ चेंडूंतील शतकाचा विक्रम मोडण्याची संधी होती, परंतु आदिल राशीदने त्याला दोन डॉट बॉल खेळवले.