
India vs England 5th T20I Wankhede Stadium Live : भारत-इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या सामन्यात दोन्ही संघांत प्रत्येकी १-१ बदल झाले आहेत. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर याने नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग करण्याचे ठरवले आहे. वानखेडेवर ८ ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ फक्त ३ वेळा जिंकला आहे. त्यामुळेच बटलरने हा निर्णय घेतला असावा, पंरतु सूर्यकुमार यादवला प्रथम फलंदाजीच करायची होती. त्यामुळे इंग्लंडच्या निर्णयानंतर तो मनातल्या मनात हसला. मात्र, त्याने आज एका खेळाडूवर अन्याय केला आणि त्याला आता थेट ऑगस्टमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.