भारत-इंग्लंड पाचवी कसोटी ३१ जुलैपासून 'दी ओव्हल', लंडन येथे खेळवली जाणार
इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे, तर चौथी कसोटी अनिर्णित राहिली होती.
या कसोटीसाठी टीम इंडियाने सरावाला सुरुवात केली, पण गौतम गंभीर संतापला
Gautam Gambhir involved in a heated exchange with Oval ground staff: भारतीय संघ पाचव्या कसोटीत विजय मिळवून इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडने चौथ्या कसोटीत विजयासाठी जोर लावला होता, परंतु शुभमन गिल, रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर मैदानावर उभे राहिले. या तिघांनी शतक झळकावताना इंग्लंडला ड्रॉवर समाधान मानण्यास भाग पाडले. या निकालाने भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे आणि ते दी ओव्हल येथे होणाऱ्या कसोटीसाठी कसून सराव करताना दिसत आहेत. पण, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचा आज पारा चढलेला दिसला.