मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे त्यावर उत्तर
भारताने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका २-२ अशी सोडवली
Gautam Gambhir shuts critics after England Test series : विराट कोहली, रोहित शर्मा हे इंग्लंड दौऱ्याच्या बरोबर महिनाभर आधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले... आता टीम इंडियाचं कसं होणार हाच प्रश्न अनेकांना पडला होता. शुभमन गिल फलंदाज म्हणून उत्तम होताच, परंतु अचानक त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी आली. त्यात परदेशातील त्याचा रेकॉर्ड फार चांगला नव्हता, त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा हा निर्णय आत्मघातकी ठरतोय का? असे वाटू लागले. या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघावरूनही गंभीरवर टीका झाली. आज पाचवी कसोटी जिंकल्यानंतर गौतम गंभीरने मोजक्या शब्दात सर्वांना उत्तर दिले.