नाईट वॉचमन आकाश दीपची फिफ्टी
यशस्वी जैस्वालही शतकाच्या उंबरठ्यावर
भारताकडे १३६ धावांची आघाडी
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: आकाश दीपने इंग्लंडची डोकेदुखी वाढवली आहे आणि त्याने यशस्वी जैस्वालसह दमदार भागीदारी केली. भारताच्या २२४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने २४७ धावाच केल्या. त्याला भारताकडून दुसऱ्या डावात दमदार उत्तर मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आकाशने इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले आहे. भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा युवा संघाला चिअर करण्यासाठी दी ओव्हल मैदानावर पोहोचला आहे.