भारताच्या पहिल्या डावात २२४ धावा
इंग्लंडच्या प्रत्युत्तरात लंच ब्रेकपर्यंत १ बाद १०९ धावा
आकाश दीपने मिळवून दिली पहिली विकेट, बेन डकेट माघारी
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: इंग्लंडने पाचव्या कसोटीत वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळत आहे. भारतासाठी निर्णायक असलेल्या दी ओव्हल कसोटीत गस अॅटकिन्सनने पाच विकेट्स घेतल्या. भारताचा पहिला डाव २२४ धावांवर गडगडला आणि दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने १०९ धावा केल्या. आकाश दीपने ( Aakash Deep) भारताला विकेट मिळवून दिली. त्याचवेळी त्याने बेन डकेटला ( Ben Duckett ) डिवचले अन् वातावरण तापण्यापूर्वीच KL Rahul ने भारतीय गोलंदाजाल मागे खेचले.