
इंग्लंडने पाचव्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला
शुभमन गिल सलग पाचव्या कसोटीत टॉस हरला, भारताच्या संघात चार बदल
या मालिकेत तीन खेळाडूंना गौतम गंभीरने एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारत-इंग्लंड यांच्यातली निर्णायक कसोटी आजपासून दी ओव्हल येथे सुरू झाली आहे. बेन स्टोक्सने माघार घेतल्याने यजमान इंग्लंडची बाजू किंचित कमकुवत झाली असली तरी त्यांना हलक्यात घेण्याची चूक भारताला महागात पडू शकते. इंग्लंडचा संघ चार बदलांसह या कसोटीत खेळणार आहे, तर भारताच्या संघातही बदल झाले आहेत. मालिकेतील शेवटच्या कसोटीत भारताने चार बदल केले, परंतु या मालिकेत तीन खेळाडू हे बाकावर बसून राहिले.