शुभमन गिलला अती घाई महागात पडली
करुण नायरच्या अर्धशतकाने टीम इंडियाची लाज वाचवली
इंग्लंडचा प्रमुख जलदगती गोलंदाज दुखापतीमुळे मैदानाबाहेर
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारत-इंग्लंडच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळातील पहिली दोन सत्र यजमानांची गाजवली. पावसाच्या व्यत्ययात झालेल्या दिवसाच्या खेळात करुण नायरने ( Karun Nair) तिसरे सत्रात अर्धशतक झळकावताना टीम इंडियाला पुनरागमन करून दिले. त्याच्यासोबतीला वॉशिंग्टन सुंदर उभा राहिला. इंग्लंडने सामन्यावर घेतलेली पकड नायरच्या खेळीने सैल झाली. त्याचवेळी यजमानांना एक मोठा झटका बसला. संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज ख्रिस वोक्स ( Chris Woakes) याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले.