गस अॅटकिन्सनच्या पाच विकेट्समुळे भारताचा पहिला डाव २२४ धावांवर गार
इंग्लंडचे तीन फलंदाज १५८ धावांवर माघारी परतले, झॅक क्रॉलीचे अर्धशतक
प्रसिद्ध कृष्णा व जो रूट यांच्यात शाब्दिक बाचाबाची
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: ओव्हल मैदानावर क्रिकेटमधील दुर्मिळ घटनांपैकी एक पाहायला मिळाली, कारण शांत स्वभावाच्या जो रूटने ( Joe Root) आपला संयम गमावला आणि जोरदार वादविवाद झाला, जो सोडवायला अम्पायरला मध्यस्थी करायला लागली. ओव्हल कसोटीत सलग दोन शतके झळकावणारा रूट २२ व्या षटकात फलंदाजीला आला, तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने त्याच्यासोबत वाद घातला.