Karun Nair Scores 205 Runs in 8 Innings esakal
Cricket
IND vs ENG 5th Test: ८ वर्षांनी संधी मिळाली, पण Karun Nair ने माती केली! कसोटी कारकीर्द संपल्यात जमा, कारण...
India vs England 5th Test Marathi Cricket News: तब्बल ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या करुण नायरसाठी ही मालिका निराशाजनक ठरली.
Summary
भारताने पाचव्या कसोटीत २४५ धावांची आघाडी घेतली आहे
आकाश दीपचे अर्धशतक अन् यशस्वी जैस्वालच्या शतकाने मैदान गाजवले
करुण नायरच्या अपयशाने मात्र टीम इंडियाचे टेंशन वाढवले
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: आकाश दीपच्या अर्धशतकाने इंग्लंडची झोप उडवली असताना यशस्वी जैस्वालनेही ( Yashasvi Jaiswal) याने शतक झळकावले. इंग्लंडची २३ धावांची आघाडी मोडून काढताना आकाश व यशस्वी यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५० चेंडूंत १०७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताने पाचव्या कसोटीत सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे. पण, करूण नायरने ( Karun Nair) ८ वर्षानंतर मिळालेल्या संधीचं सोनं केलं नाही. आता त्याला पुन्हा संधी मिळणे अवघड दिसतेय...