भारताच्या पहिल्या डावातील २२४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडच्या २४७ धावा
मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांच्या प्रत्येकी ४ विकेट्स
इंग्लंडची पहिल्या डावात फक्त २३ धावांची आघाडी
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: गोलंदाजांनी भारतीय संघाला पाचव्या कसोटीत पुनरागमन करून दिले. इंग्लंडने पहिला डावा २२४ धावांवर गुंडाळला आणि सलामीवीरांनी दमदार कामगिरी करून मजबूत पाया रचला. पण, मोहम्मद सिराजने एका स्पेलमध्ये तीन मोठे मासे गळाला लावले अन् इंग्लंडचा डाव गडगडला. प्रसिद्ध कृष्णानेही चांगला मारा केला. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताने १०६ धावा देताना इंग्लंडच्या ६ फलंदाजांना माघारी पाठवले अन् मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.