यशस्वी जैस्वालची खेळी ११८ धावांवर संपुष्टात आली
भारताकडे २६०+ धावांची आघाडी
रोहित शर्माची मॅच पाहण्यासाठी खास उपस्थिती
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) खणखणीत शतक झळकावून टीम इंडियाला फ्रंट सीटवर बसवले. यशस्वी १६४ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह ११८ धावांवर बाद झाला. शतक झळकावून यशस्वीनं केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले आहे. त्याने फ्लाईंग किस व हार्टचा साईन केलं आणि ते कुणासाठी होतं, याची चर्चा रंगली आहे.