मोहम्मद सिराज पाचव्या कसोटीचा नायक ठरला
भारताने पाचवी कसोटी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली
जसप्रीत बुमराहने वर्कलोड व्यवस्थापनामुळे तीन सामने खेळले
Mohammed Siraj on bowling 1113 deliveries in a Test series : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजने सर्व पाच सामने खेळले. जसप्रीत बुमराह वर्कलोड व्यवस्थापनामुळे तीनच सामने खेळला आणि अशा परिस्थिती सिराज हा टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज म्हणून जबाबदारी स्वीकारत चमकला. बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजची गोलंदाजी अधिक बहरली आणि त्यामुळे टीम इंडियाने विजयही मिळवले. एकीकडे वर्कलोडची चर्चा होत असताना सिराजच्या समर्पणाचे कौतुक होताना दिसत आहे. पाचव्या कसोटीनंतर सिराजला जेव्हा त्याच्या गोलंदाजीबाबत विचारल्या असता त्याने दिलेले उत्तर मन जिंकणारे ठरले.