
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारत-इंग्लंड पाचवी कसोटी पाचव्या दिवशी रोमहर्षक वळणावर आली. विजयासाठी फक्त ३५ धावांची गरज असणाऱ्या इंग्लंडला मोहम्मद सिराजने जमिनीवर आणले... सिराजने त्याच्या पहिल्या दोन षटकांत दोन विकेट्स घेतल्या आणि विजयाच्या स्वप्नात रमलेल्या इंग्लंडचा जबरदस्त चपराक मिळाली. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवून दुखापतग्रस्त ख्रिस वोक्सला फलंदाजीला येण्यास भाग पाडले. गस एटकिन्सन खिंड लढवत होता, पंरतु त्याला अपयश आले. Mohammed Siraj ने पाच विकेट्स घेत भारताला ६ धावांनी विजय मिळवून दिला.