भारतीय संघाने पाचव्या कसोटीत ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला
मोहम्मद सिराजने पाच , तर प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट्स घेतल्या
सामन्यात ९ विकेट्स घेणाऱ्या सिराजला प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकला
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: मोहम्मद सिराजने जबाबदारीत पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली. जसप्रीत बुमराहच्या गैहरजेरीत सिराजच्या खांद्यावर सर्व भार होता आणि त्याने अफलातून गोलंदाजी करताना भारताला थरारक विजय मिळवून दिला. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५ धावा हव्या होत्या आणि त्यांच्याकडे चार विकेट्स होत्या. पण, सिराजने पाचव्या दिवशी पहिल्या तासाभरात इंग्लंडचा खेळ खल्लास केला. भारताने अवघ्या ६ धावांनी ही मॅच जिंकून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.