How Hardik Pandya’s policy affected Bumrah’s captaincy chances
रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीमुळे टीम इंडियात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता कर्णधार कोण ते चौथ्या क्रमांकावर, सलामीला फलंदाजीला कोण? असे अनेक प्रश्न येऊ लागले आहेत. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी या आठवड्याच्या शेवटी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. पण, कर्णधार कोण असेल यावरून पेच आहेच. उप कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहला डावलून शुभमन गिल याचे नाव पुढे येत आहे. जसप्रीत बुमराहला कसोटी कर्णधारपद का दिलं जाणार नाही आणि यामागे हार्दिक पांड्यासाठी वापरलेल्या पॉलिसीचा काय संबंध ?