लॉर्ड्स कसोटीत भारताला थोडक्यात पराभवाने हुलकावणी दिली
रवींद्र जडेजा शेवटपर्यंत मैदानावर उभा राहिला, परंतु इंग्लंडने बाजी मारली
भारताच्या पराभवानंतर जडेजाच्या संथ खेळीला दोष देण्यात आला
England vs India Test Series: लॉर्ड्स कसोटीतील पराभव हा भारतीयांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या रवींद्र जडेजाने शेवटपर्यंत जोर लावला, परंतु मोहम्मद सिराजची दुर्दैवी विकेट पडली अन् जडेजाची मेहनत वाया गेली. जडेजा १८१ चेंडूंत ६१ धावांवर नाबाद राहिला. पण, जडेजाच्या खेळीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनिल कुंबळे, सुनील गावस्कर, रवीचंद्रन अश्विन, सौरव गांगुली आदींनी जडेजाने आक्रमक खेळ करायला हवा होता, असे मत व्यक्त केले. पण, भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने वेगळेच मत व्यक्त केले.