इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने शतक झळकावून भारताचा डाव वाचवला.
सामना ड्रॉ घोषित करण्यासाठी बेन स्टोक्सने जडेजाला हस्तांदोलनाचा प्रस्ताव दिला, पण जडेजाने नकार दिला.
इंग्लंडने सामन्यानंतर हस्तांदोलन न करत नाराजी व्यक्त केली, ज्यावर मोठा वाद निर्माण झाला
Sachin Tendulkar Breaks Silence On Handshake Controversy: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठीची इंग्लंड-भारत मालिका २-२ अशी बरोबरी सुटली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिद्द, चिकाटी अन् हार न मानण्याच्या वृत्तीचे प्रदर्शन दिले. शुभमन गिल, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चौथ्या कसोटीत दमदार फलंदाजी केली. ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या या सामन्यात दुसऱ्या डावात भारताचे दोन फलंदाज शून्यावर तंबूत परतले होते. चौथ्या दिवसाच्या पहिल्या षटकात बसलेल्या या धक्क्यानंतर टीम इंडियाचे सावरणे अवघड होते, पण गिल आणि केएल राहुलने सामना फिरवला. राहुल ९० धावांवर बाद झाला.