Huddle talk by Gambhir and Gill inspires Indian team before England Test : भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका २० जूनपासून म्हणजेच आजपासून बरोबर आठव्या दिवशी सुरू होत आहे. भारतीय संघाकडे यजमान इंग्लंडचा सामना कसा करता येईल,याच्या तयारीसाठी आठवडा हातात आहे. भारताचे सर्व खेळाडू आता लंडनमध्ये दाखल झाले आहेत आणि सरावालाही लागले आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नवीन कर्णधार शुभमन गिल यांनी आज टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत हडल टॉक केले. गौतमने यावेळी युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल असे भाषण केले आणि त्याचवेळी तीन वरिष्ठ खेळाडूंशिवाय आपल्याला ही मालिका खेळायची आहे, याची जाणीव करून दिली.