
Jos Buttler Taking Autograph of Indian Cricketer: भारताच्या दिव्यांग संघाने काल चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत सेमीफानलच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत भारताने फायनल गाठली आणि अंतिम सामन्यात इंग्लंडला ७९ धावांनी पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केली. भारताच्या या दमदार विजयानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचा कर्णधार जॉस बटलरने भारतीय दिव्यांग संघाचा क्रिकेटपटू धर्मवीर पाल याच्यातडून ऑटोग्राफ घेतला.