
India Team won PD Champions Trophy 2025: सध्या सर्वत्र पाकिस्तान आणि दुबईत १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा सुरू आहे. पण त्याआधीच भारताच्या दिव्यांग संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. मंगळवारी दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पार पडला. भारत आणि इंग्लंड संघात हा सामना झाला.
दोन्ही संघ तुल्यबळ संघ असल्याने हा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता होती. पण भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ७९ धावांनी विजय मिळवला आणि साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढला. यासह भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले.